शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार ? पुण्यात बोलतांना दिले संकेत

संग्रहित छायाचित्र....

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू, असे शरद पवार म्हणाले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली, दरम्यान शरद पवार बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू, असे पवारांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भूमिका महत्वाची ठरणार आहे. जर शरद पवार माढ्यातून लढले तर विजयसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)