शरद पवारांनी माढातून निवडणूक लढावी 

File photo

राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत नेत्यांचा आग्रह 

मुंबई –
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:हून यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहिर केल्यानंतरही आता स्वपक्षातूनच त्यांच्यावर लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला जात आहे. देशातील वातावरण बदललेले असल्याने पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत जावे अशी मागणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील हे खासदार आहेत. पुणे येथील बैठकीत त्यांनीच माढामधून शरद पवार यांनी लोकसभा लढवावी असे सुचविले होते. मात्र, त्यावर निवडणूक लढविण्याबाबत पवार यांनी ग्रीन सिग्नल दिलेला नाही. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमिवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीत पुन्हा शरद पवारांच्या उमेदवारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेसाठी मित्रपक्ष एकत्र यावेत असे आम्हाला वाटत आहे. भाजप- सेनेचा पराभव करण्याची ज्या पक्षांची इच्छा आहे त्या सर्व पक्षांना बरोबर घेतले जाईल. त्यासाठी स्वत: शरद पवार जातीने लक्ष घालत आहेत, असे सांगत उद्या, गुरुवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या बैठकीत लोकसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघात आखणी केली जाणार असून लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. शिवाय लोकसभेचे कॅंपेन कसे करायचे यावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जागावाटप एकत्रित जाहीर होणार

लोकसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आहे. समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा दोन्ही पक्षांचा विचार आहे. सध्या दोन्ही पक्षांतील 44 जागांचे वाटप झाले आहे. मित्रपक्षांबरोबर बोलणी झाल्यानंतर शेवटी आघाडीच्या एकत्रितच जागा जाहीर केल्या जातील. वेगवेगळया जागा जाहीर होणार नाहीत, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)