शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे शरद पवार हेच शेतकऱ्यांचे वैरी- भाजप

मुंबई: स्वामिनाथन आयोग वर्षानुवर्षे भांडवलशाही पोसण्यासाठी शरद पवारांनी स्वामिनाथन आयोगाची एकही शिफारस लागू केली नाही. स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे शरद पवार हेच शेतकऱ्यांचे वैरी होते, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हि टीका केली.

लोकसभा निवडनूक काही दिवसांवर येऊन ठेपली. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. शरद पवार कृषिमंत्री असताना २००६ साली डॉ. स्वामिनाथन आयोग लागू झाला, मात्र सत्ताकाळात वर्षानुवर्षे भांडवलशाही पोसण्यासाठी शरद पवारांनी एकही शिफारस लागू केली नाही, अशी टीका भाजपने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.