पुणे – श्वसनाच्या त्रास होत असल्याने भाजपचे नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बापट यांची भेट घेतली. महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू असे पवार यांनी बापट यांना सांगितले.
दरम्यान, आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील गिरीश बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. खचून जावू नका, लवकर बरे व्हा, असे किरीट सोमय्या म्हणाले. खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोघांच्या संबंधाची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात कायम होत असते.