Sharad Pawar | Ajit Pawar | गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दोन्ही बाजूंनी मनोमीलनासाठी वातावरणनिर्मिती झाली होती. मात्र, काल पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात शरद पवार यांनी या चर्चांना आणि शक्यतांना फुलस्टॅाप दिला आहे.
भाजप आणि भाजपसोबत जाणाऱ्या संधीसाधू लोकांसोबत आपल्याला जायचे नाही, असा स्पष्ट संकेत शरद पवार यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. शरद पवारांनी यांनी थेट अचानाक युतीच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.
२२ जूनला बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत स्वतः अजित पवार हे चेअरपदासाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांचे देखील पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहे. यामुळे शरद पवार यांचे विधान हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.
माळेगाव सहकारी साखर कारकाखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेल उभे करण्यासंदर्भात अजित पवार यांनी सूतोवाच केले होते. शरद पवार गटाने सहा जागांची मागणी केली होती. अजित पवार चार जागा सोडायला तयारी झाले होते. मात्र, सर्व बोलणी अंतिम टप्प्यात सुरू असताना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी थेट आपले निलकंठेश्वर पॅनेल जाहीर केले.
या पॅनेलमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांचा समावेश नव्हता. त्यामुळे शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या नेतृत्त्वाखाली बळीराजा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. अजित पवार यांनी अंतिम टप्प्यात आपले निलकंठेश्वर पॅनेल जाहीर केल्याने याबाबत शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली होती.
या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. अजित पवार आतापासूनच शरद पवारांसोबत असणाऱ्या लोकांना अशी वागणूक देत असतील तर भविष्यात ते काय करतील, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. शरद पवार यांनी अजित पवार आणि भाजप यापैकी कोणासोबतच जायचे नाही, असा निर्णय घेतला.
हेही वाचा: महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश