मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखीचा जास्त त्रास झाल्यामुळे तातडीने रग्णालयात दाखल करण्यात आले होते. 31 तारखेला ते रुग्णालयात दाखल होणे अपेक्षित होते. पण, दुखणं अधिव जाणवू लागल्यामुळे ते एक दिवस आधीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. ज्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली असून ती यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या चमूचे आभारही मानले. तर, राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधाताना दिली. यातच शरद पवार यांची आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
नवाब मलिक म्हणाले,’शरद पवार यांना 7 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि दिवसानंतर जर त्याचे शरीर चांगले साथ देत असेल तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांच्या भेटीस जाण्याचे टाळावे, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे. पवार साहेबांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत. तसेच त्यांचा हेअल्थ अपडेटबाबत एसीपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सुद्धा माहिती देण्यात आली आहे.
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांची आज डॉक्टरांनी तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी दिली. https://t.co/FcZIgu5bYc
— NCP (@NCPspeaks) April 3, 2021