शरद पवारांनी करून दाखवलं ! उदयनराजे-शिवेंद्रराजे एकत्र

सातारा : उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामधील वादाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. या दोन्ही राजेंमधील वाद काही वेळेस तर इतके विकोपाला गेलेत की दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी दोन-हात केले आहेत. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यादरम्यान उडणारे खटके हे सातारकरांसाठी नवे नाहीत मात्र आज साताऱ्यात घडलेला किस्सा सातारकर आणि एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्य व्यक्त करायला लावणारा आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एका खाजगी कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले होते. शरद पवार यांनी या कार्यक्रमावेळी दोन्ही राजेंना आपल्या बाजूने बसवून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे सातारमध्ये बोलले जात आहे.

यावेळी पवारांनी दोन्ही राजेंना एकाच गाडीमध्ये देखील बसायला लावले होते. शिवेंद्रराजेंनी यावेळी जेष्ठ नेते शरद पवार आणि बंधू उदयनराजे यांचे सारथ्य केले. मात्र आता  लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी साताऱ्यामध्ये दोन्ही राजेंना एकत्र आणून विरोधकांची चिंता आणखीनच वाढवली आहे. असे असले तरी पवारांनी घडवून आणलेले मनोमिलन निवडणुकांपर्यंत टिकते का? हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)