पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभांचा धडाका लागला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. यादरम्यान शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्याबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची एक सभा पार पडली. यावेळी त्यांनी राजकारणात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागची कारण सांगितली. “राज्याचा चेहरा बदलला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे. त्यामुळे आम्ही राज्यात लक्ष घातले.
राज्याच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी, या ठिकाणी युगेंद्रची निवड केली. तसे राज्यात अनेक तरुण उभे केले. आम्ही महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प केला आहे. तुमची मदत हवी”, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी लोकांना केले.