मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांना कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. 4 एप्रिल रोजी पवार यांना मुंबईत आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहावं लागणार आहे.
पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते.
न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे कोरेगाव भिमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत. शरद पवारांचीही साक्ष नोंदवली जाणार असल्याचं या अगोदरच सांगण्यात आलं होतं. शरद पवार यांची साक्ष घेण्यात यावी यासाठी ऍड. प्रदीप गावडे यांनी आयोगाकडे मागणी केली होती.