…म्हणूनच मला स्वतःला राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी चिंता वाटत नाही – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा आज करोना नियमांचे पालन करत मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, ‘तुमची सत्ता ही अधिक हातांमध्ये गेली पाहिजे.सत्ता ही कॉन्संट्रेट झाली, केवळ एकाच ठिकाणी राहिली की ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे.’ अशी भूमिका मांडली.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान बंद दाराआड चर्चा झाली होती. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. शरद पवार यांनी आज प्रथमच याबाबत भाष्य केले. भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न चर्चिला जात असतानाच पवार यांनी, बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला केलेली मदत व इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळल्याची आठवण करून देत ‘असं काही होणार नाही’ असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना पवार, “या सर्व संकटाच्या कालखंडात आपण थांबलो नाही, डगमगलो नाही. आपण करोनाला सामोरे गेलो. शेवटच्या माणसापर्यंत अन्नधान्य पोहचेल याची आपण खबरदारी घेतली. सरकारचे कार्यक्रम राबवण्यात आपण सगळे यशस्वी झालो. म्हणूनच मला स्वतःला राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी चिंता वाटत नाही.” असे देखील म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.