श्रीगोंद्यात शरद पवार, स्मृती इराणींच्या होणार सभा

श्रीगोंद्याचे रणांगण तापले, दिग्गजांच्या तोफा धडाडणार

श्रीगोंदा: श्रीगोंद्याचे राजकीय रणांगण आता चांगलेच तापू लागले आहे. दिग्गजांच्या सभांमुळे निवडणुकीत रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्यासाठी शरद पवार, तर भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यासाठी स्मृती इराणी श्रीगोंद्यात सभा घेणार आहे.

राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड म्हणाले, बुधवारी (दि.16) सकाळी 10 वा. पवार प्रचारार्थ येणार आहे. येथील महंमद महाराजांच्या मैदानात ही सभा आघाडीचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्यासाठी होत आहे.
तर भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिलिंद दरेकर म्हणाले, भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची 15 ऑक्‍टोबरला सकाळी 10 वाजता श्रीगोंद्यात सभा होणार आहे. शेख महंमद महाराज यांच्या प्रांगणात ही सभा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.