शरद पवार यांनी लोकसभा उमेदवारीचा पुनर्विचार करावा : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे धरणे

सोलापूर,(प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा उमेदवारीचा पुनर्विचार करावा यासाठी सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सात रस्ता येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले.

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासासाठी स्वतः जाहीर केले होते. मात्र त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर नातू रोहित पवार यांनी पवार यांनी आपल्या उमेदवारीचा फेरविचार करावा असे ट्‌विट केल्यानंतर चर्चा सुरु झाली. असे असतानाच सोलापुरातसुद्धा पवारांनी आपल्या माढा उमेदवारीचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.