मुंबई – युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, अन्यथा एनडीएसोबत लढणे अवघड जाईल, असे मत सिराज मेहंदी यांनी व्यक्त केले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा नेते अखिलेश यादव यांचेही हे मत असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते सिराज मेहंदी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष सोनिया दुहान उपस्थित होत्या.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना सिराज मेहंदी यांनी युपीएचे नेतृत्व पवार साहेबांनी करावे, अन्यथा एनडीएसोबत लढणे अवघड जाईल, असे मत व्यक्त केले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा नेते अखिलेश यादव यांचेही हे मत असल्याचे ते म्हणाले. #UPElections2022 #NCP
— NCP (@NCPspeaks) January 11, 2022
पुढे ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवार यांनी या परिवर्तनात सहभागी करून मला पक्षाचा सदस्य केले त्याबद्दल मला आनंद वाटतो, असेही सिराज मेहंदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, सिराज मेहंदी हे युपी विधान परिषदेचे आमदार होते तसेच अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून मागील चाळीस वर्षांपासून ते काम करत आहेत, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावेळी दिली. तसेच काही दिवसांनी शरद पवार हे उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.