कोपरगाव -कृषी, सहकार, कला, क्रीडा, उद्योग तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखे नेतृत्व आजमितीला देशात दुसरे नाही. आपल्या राजकीय अनुभवाच्या शिदोरीवर तीन पक्षांना एकत्रित आणून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करून राज्यातील जनतेला विश्वास दिला. त्यांच्या या कुशल नेतृत्वातून आज त्यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्याबाबत प्रमुख विरोधी पक्षांमध्ये हालचाली सुरू आहे. देशातील एनडीए सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे धाडस व सर्वसमावेशक घटकांचा विकास घडवून आणण्याची क्षमता पवार यांच्याकडे असून, सन 2024 च्या निवडणुकीत पवार देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान व्हावेत, अशी इच्छा आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आमदार काळे यांच्या पुढाकारातून करोनाच्या आवश्यक उपाययोजना करून कृष्णाई मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार काळे म्हणाले, पवार हे विचारांचा अथांग महासागर आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच झटत असतात. त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा देवून उत्साह वाढवीत असतात.
कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरुपातील खोदकाम पूर्ण होण्यामागे पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याकडे ज्या ज्यावेळी मतदार संघातील विकासकामांचे प्रश्न घेवून गेलो त्या-त्यावेळी त्यांनी त्याबाबत तातडीने मार्ग काढले आहे.
प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले. राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कारभारी आगवन, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, सुनील साळुंके, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा स्वप्नजा वाबळे, शहराध्यक्षा प्रतिभा शिलेदार, महिला युवती अध्यक्षा नगरसेविका माधवी वाकचौरे, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, फकीर कुरेशी, कृष्णा आढाव, सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, सोनाली रोहमारे
पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, अनिल कदम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब बारहाते, राजेंद्र घुमरे, विठ्ठलराव आसने, काकासाहेब जावळे, ज्ञानदेव मांजरे, सचिन रोहमारे, संजय आगवण, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे आदी उपस्थित होते.