मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर राजकारणात विरोधी पक्ष म्हणून पोकळी निर्माण झाली आहे. विरोधाची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे, असे शरद पवारांनी सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले कि, विरोधाची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. त्यामुळे ही पोकळी भाजप भरुन काढेल की मनसे हे येणाऱ्या काळात कळेल. तसेच राज ठाकरेंना समर्थन देणारा मोठा वर्ग आहे. पण तो प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होतो का? याबाबत शंका आहे. लोक फक्त राज ठाकरेंची मते जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, असेही पवारांनी सांगितली.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असाही विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा