मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना आज पोटात त्रास जाणवू लागल्यामुळे पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या संदर्भात माहिती दिली असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. सोमवारी शरद पवार यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजीत करण्यात आलं होतं.
शरद पवारांच्या पोटात सोमवारी दुखू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्याचवेळी बुधवारी त्यांची सर्जरी नियोजित करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारीच ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होणार हे अपेक्षित होतं. मात्र, आज पुन्हा पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्वीट करून दिली आहे.
Our party chief #SharadPawar was supposed to be admitted in hospital for endoscopy and surgery procedure tomorrow, but since he is experiencing some pain again in the abdomen, he is admitted in Breach Candy Hospital in Mumbai today: @nawabmalikncp, #Maharashtra Minister pic.twitter.com/pTgKFkHUPu
— NewsMobile (@NewsMobileIndia) March 30, 2021
दरम्यान शरद पवार यांना बॉल स्टोनचा त्रास आहे. त्यासाठी एंडोस्कोपी उद्या केली जाईल. डॉक्टर मायदेव त्यांच्यावर उद्या दुपारी ३ च्या सुमारास एंडोस्कोपी करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.