पंढरपूर: विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शेवटचे २ दिवस राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत असून आज त्यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेला संबोधित केले.
शरद पवार म्हणाले, आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही.. तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही.