Sharad Pawar on Z Plus । राज्याचे ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )चे प्रमुख शरद पवार यांना केंद्र सरकारने Z+ सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेविषयी आता शरद पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. याविषयी बोलताना,”मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था”असल्याचे म्हणत शरद पवार यांनी केंद्रावर आरोप केला आहे.
केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा कवच देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे. त्यावरच पवारांनी संशय व्यक्त केलाय.
ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था Sharad Pawar on Z Plus ।
केंद्र सरकारनं देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “काल माझ्याकडे केंद्रातील गृहखात्याचे एक अधिकारी आले. कदाचित निवडणुका आहेत. निवडणुकांसाठी मी सगळीकडे फिरणार, त्यामुळे निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था असू शकते, बाकी मला काही माहिती नाही.” असे म्हणत केंद्राच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
निवडणुकीचे दौरे लक्षात घेऊन सुरक्षेत वाढ Sharad Pawar on Z Plus ।
महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेला तणाव हे शरद पवारांच्या सुरक्षा वाढवण्यामागचं कारण असू शकते, असं मानलं जात आहे. आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं शरद पवार यांचे विधानसभा निवडणुकीचे दौरे लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच शरद पवारांना देण्यात आलेली झेड प्लस सुरक्षा यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता शावर पवारांनीच याविषयी वक्तव्य केल्याने या सुरक्षेकडे खरंच संशयाने पाहिले जात आहे.