Sharad Pawar on Vidarbha Assembly seat । देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवल्यानंतर आता आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत विधानसभेच्या जागावाटपावरुन आमच्यात मतभेद नाहीत, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीत जागावाटपावरील मतभेत उघड होण्यास सुरुवात झाली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नागपूरसह आगामी विधानसभेसाठी वाढीव जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरसह विदर्भात वाढीव जागांची मागणी Sharad Pawar on Vidarbha Assembly seat ।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नागपूरसह विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी वाढीव जागांची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फक्त काटोल आणि हिंगणा या दोन जागांवर निवडणूक लढवत होती. मात्र आता पवारांच्या पक्षानं काटोल, हिंगणा, उमरेड या ग्रामीण भागातील तीन जागांसह नागपूर शहरातील किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. म्हणजे, शरद पवारांच्या पक्षानं नागपूरसह विदर्भात एकूण पाच जागा मागतल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला वाढीव जागांची अपेक्षा Sharad Pawar on Vidarbha Assembly seat ।
दरम्यान, विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला वाढीव जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला देण्यात यावी, अशी मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा पेच आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.
तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या या मागणीने आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकंदरीत काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील 62 जागांपैकी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं फक्त 12 जागा लढवल्या होत्या. यंदा मात्र पक्षानं प्रत्येक जिल्ह्यात जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा
“मनोज जरांगेंनी २८८ लढाव्यात, तर…” प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला
“पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून माने यांनी विजयाचा दिवा लावला” ; हर्षवर्धन पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य