पुणे- मी घेतलेली लस करोनाची नाही. मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही करोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. असं स्पष्टीकरण सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लशीवर शरद पवारांनी दिलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा करु नये, असंही ते म्हणाले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे शांततेच्या मार्गाने तिथे गेले होते. तसंच त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायची होती. त्यांच्यासोबत जे काही घडलं तेही योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी हाथरस प्रकरणाबाबत दिली आहे.