Sharad Pawar on Reservation । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पुढे येत आहे. त्यातच आता याच आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं. यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार पुढे म्हणाले आहेत . त्यांच्या या विधानाने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना Sharad Pawar on Reservation ।
आरक्षणाच्या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी,”मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना असल्याचे म्हटले. तसेच “इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी,”त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला.
त्यांना जे योग्य वाटते तेच ते बोलतात Sharad Pawar on Reservation ।
त्यानंतर पुढे त्यांना,”तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून? असा सवाल करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी,”जसे जसे वय वाढते तस तशी एनर्जी वाढते. यावेळी बोलतना शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्याबबातही प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जे योग्य वाटते ते भले सरकारच्या विरोधात असतील तरी बोलतात असंही शरद पवार म्हणाले.
अमित शाह यांच्या 18 सभापैकी 14 ठिकाणी पराभव झाला
अमित शाहा यांचा अलीकडे महाराष्ट्रात मुक्काम जास्त असतो याबाबत प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशाचा गृहमंत्री भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असे बोलतात. लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या 18 ठिकाणी सभा झाल्या होत्या. यामध्ये 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळं यावेळी देखील त्यांनी जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी लगावला.