Sharad Pawar on Raj Thackeray महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी एकमेकांवर टिका करत असतानाच, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि इतरही पक्षांमधून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांवर ताशेरे ओढले असून, शरद पवारांवरही जातीयवादाचे आरोप केले आहेत. यावर आता शरद पवारांनी ठाकरेंना थेट उत्तर दिलं आहे.
जातीयवादावरून वाद, शरद पवारांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे यांनी काही मुलाखतींमधून शरद पवार यांना महाराष्ट्रात जातीयवाद वाढवल्याबद्दल दोष दिला आहे. त्यांच्यामते, १९९८ पासून राज्यात जातीयतेला खतपाणी मिळालं, ज्याचं मुख्य कारण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना असल्याचं ते म्हणतात. ठाकरे यांच्या या आरोपांवर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं.
“सोडून द्या अशा आरोपांना…”
राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांनी त्यांना खोचक उत्तर दिलं. “महाराष्ट्रात जातीयवाद केल्याचं एक उदाहरण तरी दाखवा. आयुष्यात काही न केल्यामुळे फक्त वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची गरजच नाही,” असा टोला शरद पवारांनी लगावला.
“महाराष्ट्राच्या जनतेने फक्त एकच जागा दिली…” Sharad Pawar on Raj Thackeray
राज ठाकरेंना आणखी एक टोला लगावताना शरद पवारांनी, 2019 विधानसभा निवडणुकीतील मनसेचा एकचं आमदार निवडून आल्याचा संदर्भ दिला. “महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना एकच जागा दिली, तेवढाच त्यांचा प्रभाव आहे,” असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर पवारांचं मत Sharad Pawar on Raj Thackeray
शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्यावर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानावरही शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. “निवडणुका जवळ येतात तेव्हा असे आरोप प्रकर्षाने समोर येतात, पण सहकाऱ्यांविषयी बोलताना प्रत्येकाने थोडा संयम बाळगावा,” असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं.