Sharad Pawar on Assembly । राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राजकीय वर्तुळात रोज नवीन खलबतं होत आहेत. त्यातच आता सत्ताधारी आणि विरोधकांनी आगामी निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपले लक्ष एकच आहे आणि ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका..” असं म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी आज काल भारतीय संघाने t-२० विश्वचषकाचा खिताब पटकावल्यानंतर खेळाडूंचे अभिनंदन केले. याविषयी बोलताना त्यांनी,“कालच्या सामन्यात भारतीय टीमने अद्भूत चमत्कार केला. चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती. ज्या वेळेला 24 चेंडूत 26 धावांची आवश्यकता होती, तेव्हा काही खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. त्यात आपल्याला यश आलं. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, या सगळ्यांनी चांगला खेळ दाखवला. आपण टी 20 वर्ल्ड कप विजयासाठी 100 टक्के खेळाडूच कौतुक केलं पाहिजे. उत्तम शिक्षक मिळाला, द्रविडने योग्य मार्गदर्शन केलं, आत्मविश्वास वाढेल असा सल्ला दिला. त्याचाच परिणाम सामुदायिक यशामध्ये झाला” असं शरद पवार म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जेडीयू, टीडीपीचे खासदार नाराज आहेत असं म्हटलय. त्यावर शरद पवार म्हणाले की, “माझ्या ऐकण्यात आलेलं नाही. सध्या कुठल्याही खासदाराला निवडणूक नकोय” “अशी काही गडबड झाली, तर निवडणुकीला सामोर जावं लागेल. नको रे बाबा निवडणूक अशी भावना आहे” असं शरद पवार म्हणाले. आगमी विधानसभा निवडणूक हे आपलं लक्ष्य आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
आता एकच लक्ष्य आगामी विधानसभा Sharad Pawar on Assembly ।
पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे काही नगरसेवक आपल्याला भेटून गेले. लोकसभा निवडणुकीनतंर काय दृष्टीकोन बदललाय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “लक्ष्य एकच आहे. उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक. या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना एकत्र लढणार आहे” असं शरद पवार म्हणाले.
‘माझे पाय जमिनीवर आहेत’ Sharad Pawar on Assembly ।
“मागच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डावे सुद्धा सोबत होते. त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. तीन महिने हातामध्ये आहेत. दोन अडीच महिने मिळतील, त्याचा लाभा घ्यावा हा आमचा प्रयत्न आहे” असं शरद पवार म्हणाले. राज ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीने सगळ्यांना जमिनीवर आणलं, त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘माझे पाय जमिनीवर आहेत’ मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे ठेऊन निवडणूक लढवावी असं संजय राऊत म्हणतात, त्यावर ‘आम्ही तिघे एकत्र आहेत. आमचा सामूहिक चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेऊ इच्छितो’ असं उत्तर त्यांनी दिलं.