NCP Merge : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे. (NCP Merge) मुंबईत पार पडलेल्या या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेला आला होता. (NCP Merge) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि नेत्यांनी पक्षाने विलिनीकरणाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावर बोलताना सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. या भूमिकेमुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मोठा धक्का बसला आहे. (NCP Merge) शरद पवार शांत; चर्चांना उधाण विशेष म्हणजे या बैठकीत शरद पवार स्वतः उपस्थित होते. मात्र विलिनीकरणाबाबत भूमिका मांडली जात असताना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार देखील या भूमिकेशी सहमत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (NCP Merge) शशिकांत शिंदेंची स्पष्ट भूमिका दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना “पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असून सक्षम विरोधी पक्ष उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विलीनीकरणाचा विषय आता संपला आहे,” असे स्पष्ट केले. यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (NCP Merge)