पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाण साधत जहरी टीका केली आहे. शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यांच्या या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?
शरद पवार हे राज्यातील मिनी औरंगजेब आहेत. आपल्या आयुष्यात शरद पवार फक्त दोन वेळेस रायगडावर गेले आहेत. नुकतेच शरद पवारांसमोर अहमदनगरचे नाव अहमदनगरच राहिले पाहिजे म्हणून घोषणाबाजी करण्यात आलीय. त्यामुळे ही घोषणाबाजी करणारे लोकं कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. सोबतच धनगर समाजाचे वाटोळे हे शरद पवारांनीच केले आहे. अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकरांनी केले आवाहन
शरद पवारांच्या 50 वर्षाच्या राजकारणात कधी त्यांनी 100 आमदारही निवडून आणले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण काहीही बदलेले नाही. शरद पवार फुकटची हवा करत आहेत. त्यामुळे ओबीसी, भटक्या विमुक्तांनी आणि गरीब मराठ्यांनी जागे व्हायला हवं, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.