मुंबई – संजय राऊत यांच्यावर ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेताच मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे संजय राऊतांवर ईडीच्या कारवाईवरुन पंतप्रधान मोदी यांना भेटले होते. आता त्यांच्या भेटीनंतरच ही कारवाई झाल्याचे सांगत हीच खरी पवारनिती असल्याचे काळे यांनी ट्विट केले आहे.
संजय राऊत हे विश्वप्रवक्ते असून त्यांना ज्यावेळी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी केंद्रीय यंत्रणाचा वापर वाढत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यावेळी संजय राऊतांसाठी शरद पवार हे भेटले अशी चर्चा रंगली होती पण पवार यांच्या भेटीचा नेमका उलटा परिणाम झाला असून यालाच बहुतेक पवारनिती असे म्हणतात अशा आशयाचे ट्विट काळे यांनी केले आहे.