शरद पवारांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

कालच संजय राऊत यांनी घेतलेली राज्यपालांची भेट

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. गेल्या  दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यामध्ये संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आज महाविकास आघाडीचे स्थापण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी, या बैठकीमध्ये केवळ राज्यातील कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर राज्यपालांसोबत चर्चा झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कालच राज्यपालांची भेट घेतली होती. यानंतर लगेचच आज शरद पवार यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल व महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटींमागे काही राजकीय अर्थ दडलेत का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

यापूर्वी, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत महाराष्ट्र सरकारच्या कोरोना विरोधातील उपाययोजना तोकड्या असल्याचा दावा केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.