Sharad Pawar । Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडिअम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजपचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षाला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा तर शरद पवार राष्ट्रवादी गटाला 10 जागा मिळाल्यात. यंदाची निवडणूक 2019च्या किंवा त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत अनेक अंगांनी वेगळी असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण निवडणुकीच्या निकालावर आता शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले, पाहा….
– आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे असा अनुभव आम्हला कधी आला नाही! मात्र आता याचा अभ्यास करावा लागणार पुन्हा एकदा कामाला लागू! : शरद पवार
– मी निवृत्त व्हावं की नाही हे, मी आणि माझे सहकारी ठरवतील दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे? : शरद पवार
– लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही रक्कम महिलांना दिली! आम्ही सत्तेत नसलो तर हे पैसे बंद होतील असा प्रचार केला! त्यामुळे कदाचित महिलांनी मत महायुतीला दिलं! : शरद पवार
– मी निवृत्त व्हावं की नाही हे, दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे? : शरद पवार
– “अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण…” विधानसभेतील अपयशावर शरद पवाराचं स्पष्टीकरकण
– बटेंगे तो कटेंगेमुळे धुर्वीकरण झाले, हे खरे आहे. : शरद पवार
– बारामती निकाला बाबत माहिती घ्यावी लागेल. धार्मिक अँगल देण्याचा प्रयत्न झाला असून, ओबीसी बाबत अभ्यास करणार. ओबीसी मंडल निर्णय माझा आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय देखील माझा होता. : शरद पवार
– भाजपकडे 132 आमदार आहेत त्यामुळे इतर मित्र पक्ष मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांच्या नादाला लागतील असं वाटत नाही. : शरद पवार