ईडीच्या कार्यालयात जाण्यावर शरद पवार ठाम – नवाब मलिक

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी 2 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार आहेत. बुधवारी पत्रकार परिषद घेऊनच त्यांनी तसे जाहिर केले होते. दरम्यान, तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसल्याचा ईमेल ईडीकडून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा गरज भासेल तेव्हा तुम्हाला बोलवण्यात येईल असा निरोप त्यांनी ईमेलमध्ये पाठवला आहे मात्र, शरद पवार ईडी कार्यालयात जाण्यावर ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादीेचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, कोणत्याही प्रकरणात एखाद्या व्यक्तीची किंवा आरोपीची चौकशी करण्याचा निर्णय घेणे हा तपासाधिकाऱ्याचा अधिकार असतो. या प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ची पंचाईत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.