करोना स्थितीचा घेणार आढावा
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील करोनाच्या साथीचा आढावा घेणार आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे. दरम्यान, सकाळी 10 वाजता महापालिकेच्या सिंहगड रस्ता येथील स्मार्ट सिटीच्या डॅशबोर्ड यंत्रणेची ते पाहणी करणार आहे.
शहरातील तसेच जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक शुक्रवारी घेतात. उद्या होणाऱ्या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असून ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.