Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाची 2 वाजता बैठक होईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या 5 वाजता शपथ घेणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता मुंबईला गेल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. ज्यात त्यांनी वेगाने घडणाऱ्या या घडामोडींवर भाष्य केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. आजचा सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. तसेच दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे. विलीनीकरणासाठी संवादाची भूमिका कायम शरद पवार पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रीकरणाची भूमिका यशस्वी व्हावी, हीच आमची इच्छा आहे. गेल्या चार महिन्यांपासून यासंदर्भातील चर्चा सुरू होती. पुढील काळात या विषयावर कोण पुढाकार घेणार, हे ठरेल. दोन्ही पक्षांमध्ये संवाद कायम राहावा, यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. विलीनीकरणाबाबतचा निर्णय १२ तारखेला जाहीर करण्याचा विचार होता. त्या चर्चेत मी स्वतः सहभागी नव्हतो. Sharad Pawar on sunetra pawar मात्र जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पक्ष विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे होती.आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता. पण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेतले असतील तरीही अजित पवार यांची एकत्रीकरणाची इच्छा पूर्ण व्हावी, अशी आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले. अजितदादा पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतला असेल. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं ते दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं आहे,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा: Preity Zinta: प्रीती झिंटाची लव्हस्टोरी: नेस वाडियासोबतच्या अफेअरपासून अमेरिकेतल्या गुप्त लग्नापर्यंतचा प्रवास