धनगर, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबत अध्यादेश काढावा – शरद पवार

सोलापूर- (प्रतिनिधी) – भाजप सरकारकडून बगल देण्यात आलेल्या आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा आळवला आहे. राज्य शासनाने धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आणि धनगर समाजच्या आरक्षणासाठी तात्काळ अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे. तसेच मराठा आणि मुस्लिम समाजालाही ओबीसी समाजाच्या मूळ आरक्षणाला धक्का न वलावता आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची शक्‍यता आहे.

भाजप सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बारामतीच्या धनगर मेळाव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत धनगरसमाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती, मात्र गेली साडेचार वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या अनेक बैठक झाल्या. पण या धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यात धनगर समाज यादीमध्ये 36 व्या क्रमांकावर आहे. आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्रात धनगड आणि ओरॉन हे समाज अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. जनगणना मानववंशशास्त्राचे संदर्भग्रंथ केंद्र सरकाराच्या जनजाती मंत्रालयातील पुराव्याच्या आधारे धनगड व ओरॉन ही जात अस्तित्वात नाहीत.

धनगर हेच अस्तित्वात आहेत. याबाबतचे अनेक पुरावे दिले आहेत. मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत धनगर समाजाचे आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले. या आरक्षणाबाबत शासनाने तात्काळ पावले उचलावीत. राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी मागणी पवार यांनी केली आहे. तसेच या आरक्षणासंदर्भात न्यायालयालादेखील सलग सुनावणी घेऊन या आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढण्याची विनंती करण्याची मागणी त्यांनी केली.

सध्या देशात 7 ते 8 एप्रिल रोजी 72 हजार जागांची मेगा भरती होत आहे. 5 मे रोजी मेडिकल पूर्वपरीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी सहभागी होणाऱ्यांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाने आरक्षणाबाबत तात्काळ घोषणा करण्याची मागणी पवारांनी केली. तसेच यापूर्वीच्या सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले होते. या निर्णयाची अमलबजावणीदेखील शासनाने केलेली नाही. त्यामुळे धनगरांसह मुस्लिम, मराठा समाजालादेखील आरक्षण देण्याची मागणी केली. हे आरक्षण लागू करताना शेडूल्ड कास्टमधील मूळ आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे असेही पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.