महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीमध्ये शरद पवारांनी 7 युवा उमेदवारांना संधी दिली आहे.
शरद पवारांनी भाकरी फिरवली
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच भाकरी फिरविण्याचे संकेत दिले होते. पक्षात युवा नेत्यांना अधिकाधिक सामावून घेण्यात येईल, असे त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले. अखेर शरद पवारांनी आज जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये 7 युवा उमेदवारांना संधी आहे.
‘हे’ 7 युवा उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात
अहेरी विधानसभा- भाग्यश्री आत्राम
घाटकोपर पूर्व-राखी जाधव
तासगाव-कवठेमहंकाळ-रोहित पाटील
पारनेर-राणी लंके
आष्टी शिरूरमधून- मेहबूब शेख
बारामती- युगेंद्र पवार
कोपरगाव- संदीप वर्पे
मुक्ताईनगर- रोहिणी खडसे