शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण कधीच पाच वर्षे पूर्ण केले नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई  – शरद पवार हे मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पण कधीच ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाही. राहिले असते तर त्यांनी चांगली कामे केली असती. कधी दोन वर्षे, कधी तीन वर्षे त्यांनी काम केले. त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना मुख्यंत्री पदावर राहता आले नाही. पण मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे. त्यामुळेच सत्ताधारी अस्वस्थ आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगाविला.

मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमावेठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद माध्यमांशी संवाद साधत पलटवार केला. फडणवीस म्हणाले, शरद पवारांची पीसी कशावर होती हेच मला
कळले नाही. कारण ते वेगवेगळ्या विषयावर बोलले. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता.

जालियनवाला बागमध्ये गोळीबार करायला त्यावेळचे गव्हर्नर गेले नव्हते. तर पोलिसांनीच गोळीबार केला होता. त्यामागे गव्हर्नरचे आदेश होते. त्यामुळे मावळचा गोळीबारही जालियनवाला बाग सारखा होता. तिथे राज्यकर्त्यांना जायची गरज नव्हती, असे फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. उच्च न्यायालयाने सीबीआय चोैकशीचे आदेश दिले. या सरकारने सीबीआयला प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे बॅंकातील अनेक प्रकरणे धुळखात पडलेली आहेत. मात्र, देशमुख प्रकरणात उच्च न्यायालयानेच सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयावर पवारांचा विश्वास आहे की नाही?, असा सवाल त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.