नवी दिल्ली ; कोरोनाने पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोकण, विदर्भ, मुंबई अशा अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या स्तरावर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.
The power of social distancing..
Be alert, Be safeसोशल डिस्टन्सिंग की ताकत
सतर्क रहे, सुरक्षित रहे..सोशल डिस्टन्सिंगची ताकद
योग्य काळजी हाच उपाय#WarAgainstVirus #LetsFightCoronaTogether #coronavirus pic.twitter.com/WQIyzXERCN— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 20, 2021
दरम्यान सामान्य नागरिकांनी स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा विळखा रोखायचा असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासह इतर महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर असाच एक संदेश सामान्यांना दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे महत्व त्यांनी यातून पटवून दिले आहे.
मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये त्यांनी हे ट्वीट केले आहे. यात शरद पवारांनी असे म्हटले आहे की, ‘सोशल डिस्टन्सिंगची ताकद, योग्य काळजी हाच उपाय’. असे कॅप्शन देत शरद पवारांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत नमुद करण्यात आले आहे.