आमदारांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार हॉटेल रेनिसान्समध्ये दाखल

मुंबई : राज्यात काल राजकारणात मोठा ट्विट निर्माण केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने सत्ता स्थापन केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले आमदार फुटू नयेत म्हणून खबरदारी घेतलेली आहे. आपल्या आमदारांना त्यांनी मुंबईतल्या पवईच्या हॉटेल रेनिसान्स येथे ठेवले आहे. त्याच रेनिसान्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पोहचले आहेत. यावेळी ते आपल्या आमदारांशी सध्य परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचे म्हटले जात आहे.


शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची संवाद साधत त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. सध्या राष्ट्रवादीचे 49 आमदार रेनिसान्समध्ये उपस्थित आहेत. त्या आमदारांना शरद पवार मार्गदर्शन करतील, अशी शक्‍यता आहे. शरद पवारांअगोदर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनीदेखील राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत संवाद साधला.

राष्ट्रवादीच्या आमदारांनीदेखील आम्ही साहेबांसोबतच असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर ज्या रेनिसान्स हॉटेलमधून भाजपने कर्नाटकचे सरकार पाडले होते. त्याच रेनिसान्स हॉटेलमधून आम्ही महाराष्ट्राचं सरकार बनवणार आहोत हा योगायोग आहे, असे ट्टीट नवाब मलिक यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)