शरद पवार यांनी संजय राऊत यांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच इतक्‍या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. छातीत दुखत असल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सोमवारी दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सोमवारीच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली.

i hospital today. Raut was admitted to hospital yesterday after he complained of chest pain (file pics) pic.twitter.com/VdhxYrKYpw

सुमारे १५ ते २० मिनिटे शरद पवार हे संजय राऊतांसोबत होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस यावेळी त्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी राजकीय चर्चा झाली की नाही, याची माहिती मिळालेली नाही.

सोमवारी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या हालचाली झाल्या. त्याचाच दुसरा अंक मंगळवारी पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेना नेते संजय राऊत याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार हेही आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या बैठकीला जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)