पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉटस्अॅप हॅक झाला आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनदेखील सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
काय लिहिले पोस्टमध्ये?
‘अत्यंत महत्वाचे माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.’ असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक केलं आहे यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सुप्रिया यांच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आल्याने आणि थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्याने यामागील व्यक्तींच्या नावासंदर्भात लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.