Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे (Sharad Pawar) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत, साखर कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी हडपल्याचा आरोप (Sharad Pawar) करण्यात आला आहे. हे प्रकरण वर्ष २००२ चे असून, भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. एकनाथ खडसेंनी या परिसरात ‘तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना’ उभारणार असल्याचे सांगितले. कारखाना सुरू झाल्यास जमिनीचा चांगला मोबदला मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात नोकरी मिळेल, असे आश्वासन दिले. फिर्यादी चमेलाबाई तायडे यांच्या म्हणण्यानुसार, खडसेंनी त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत केवळ ५१ हजार रुपये आगाऊ दिले. नंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी पूर्ण केली. मात्र, अनेक वर्षे उलटूनही त्या जागेवर साखर कारखाना उभारला गेला नाही. २०२५ मध्ये कुटुंबीयांनी जमिनीची माहिती काढली असता, ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे समोर आले. यामुळे तायडे कुटुंबीयांना धक्का बसला. Sharad Pawar खरेदीखतात फेरफार झाल्याचा धक्कादायक खुलासा ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदीखताची प्रत तपासली असता, त्यात मोठा फेरफार झाल्याचे (Sharad Pawar) दिसून आले. खरेदीखतामध्ये जेथे मूळतः ‘तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ असे नाव छापले होते, त्या जागी खाडाखोड करून ‘शारदा एकनाथ खडसे’ असे नाव लिहिण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणी तायडे कुटुंबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. महार वतनाच्या जमिनीचा प्रश्न आणि त्यातील कथित फेरफार यामुळे दलित शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षिततेच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले गेले आहे. पोलिसांनी या फिर्यादीवर आधारित तपास सुरू केला असून, खरेदीखतातील फेरफार, आर्थिक व्यवहार आणि संबंधित दस्तऐवजांची सखोल चौकशी केली जाणार आहे. एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्याकडून या आरोपांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.