शरद पवार आणि अजित पवार दुष्काळ दौऱ्यावर; सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु केला आहे. यावेळी ते या तालुक्यांमधील दुष्काळी गावांना भेटी देतील. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी दौऱ्यादरम्यान होणाऱ्या त्यांच्या सत्कारास नकार दिला आहे.

बारामती तालुका पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. पवार साहेब आणि आ. अजित पवार यांनी खैरेपडळ गावापासून आपल्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरूवात केली. दोघांनीही बारामतीतील वढणे गावच्या चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

दरम्यान, ७ जून रोजी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांच्याशी दुष्काळावरील उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आ. अजित पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.