अन्यायाची समज यायला 15 वर्षे लागल्याचे आश्‍चर्य वाटते – शरद पवार

नाशिक  – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. राष्ट्रवादीमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगणाऱ्या उदयनराजेंना समज यायला 15 वर्षे लागले याचे आश्‍चर्य वाटते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

छगन भुजबळांची अनुपस्थिती

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. मात्र, राष्ट्रावीदीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे बैठकीस अनुपस्थित होते. सध्या छगन भुजबळ हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटप संदर्भातील बैठकीसाठी मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून समीर भुजबळ हे शरद पवारांच्या बैठकीस उपस्थित होते. मात्र, तरी देखील छगन भुजबळांची पवारांच्या दौऱ्यादरम्यानची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रविवारी उदयनराजेंनी साताऱ्यात बोलताना “आयुष्यातील 15 वर्षे मी घालवली. सत्ता असताना 15 वर्षांत मी कुठली फाईल घेऊन गेलो तर ती फाईल डस्टबिनमध्ये जायची, अशी टीका राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर केली होती. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले, उदयनराजे यांना समज येणास 15 वर्षे लागली, याचे विशेष वाटते. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना-भाजपची वाट धरणाऱ्या नेत्यांवरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. ईडी, एसीबीच्या नोटीस आल्यात, म्हणून लोक सत्ताधारी पक्षात जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रातील सभा झाल्यावर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)