-->

शंतनू मुळूक 26 जानेवारीला दिल्लीत टिकरी सीमेवर आंदोलनात

दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली – ग्रेटा थनबर्ग हीने पोस्ट केलेल्या टूलकिट प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अटक केलेल्या दिशा रवी यांचा कथित साथिदार शंतनू मुळूक हा प्रजाकसत्ताक दिनी 26 जानेवारीला टिकरी सीमेवर आला होता का? याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टुलकिटमध्ये वापरण्यासाठी व्हिडिओ आणि फोटोग्राफ काढण्यासाठी तो दिल्लीला आला असावा, अशी शक्‍यता आहे. त्याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड, आणि अन्य तांत्रिक तपासणीत शंतनु हा टिकरी सीमेवर आला असल्याचे स्पष्ट होत आहे, तो शेतकऱ्यांच्या आंदोलनात 26 जानेवारीला टिकरी सीमेवर होता. तो दिल्लीत सुमारे आठवडाभर होता, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्‍सप्रेसच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

पोलिसांच्या दाव्याविषयी ऍड. सतेज जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, तेथे तो उपस्थित होता का? याची मला कल्पना नाही… तो शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनच पाठींबा देत होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.