आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव- श्रीकृष्ण भालसिंग 

 भाग्योदय विद्यालयात बालआनंद मेळावा व विद्यार्थी संचयिका प्रदर्शन

नगर: पुर्वीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचे फार कार्यक्रम नव्हते फक्त एकच पी.टी.चा तास होता. आज पुरस्कीज्ञाना पेक्षा कृतीतून शिक्षण असा अभ्यासक्रम सुरु झाला आहे. मी औरगांबाद मध्ये असताना 62 प्रकारचे खेळातुन शिक्षण असे पुस्तक तयार करुन शिक्षणाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला. बाल आनंद मेळाव्यातुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. एक चांगले व्यक्तीमत्व अशा कार्यक्रमातुन घडत असते, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले.

भाग्योदय माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा व विद्यार्थी संचियीका प्रदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव राघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेवराव बेरड, रजिस्ट्रार खंडेराव दिघे आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य ज्ञानदेवराव बेरड यांनी, विद्यालयात वर्षभरात विविध अभ्यास व अभ्यासपुरक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बाल आनंद मेळावा व संचियीका प्रदर्शन हा शैक्षणिक वर्षातील शेवटचा कार्यक्रम आहे. आज शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. 2010 पासून सातत्यपुर्ण सर्वांकश मुल्यमापन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, कल चाचणी अशा प्रकारे कृतीयुक्त अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी बाल आंनद मेळ्याव्यात टाकावु पासुन टिकावु वस्तु, जुनी नाणी, हस्त कला, विनकाम, मातीकाम, कवीता, जुनी भांडी, जुने अवजारे व हत्यारे, घरगुती तांब्याचे भांडे या व्दारे विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळालेला आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थचे स्टॉल विक्रीसाठी लावले आहे. त्यातुन व्यवहारीक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. अध्यक्ष रघुनाथ लोंढे यांनी विद्यालयात दरवर्षी वार्षिक नियोजनाप्रमाणे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांकरीता राबविले जातात.

विद्यालयात शाळाबाह्य उपक्रम राबविले जातात. विद्यालयाचा शैक्षणिक निकाल सुद्धा दरवर्षी चांगला लागतो. विद्यालयाने बालआनंद मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने विद्यालयाला धन्यवाद दिले.
प्रास्तविक पोपट येवले यांनी केले. तर आभार एकनाथ होले यांनी मानले.सुत्रसंचालन संजय गोसावी याने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे बाबासाहेब कोतकर, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, धनंजय बारगळ, रुपाली शिंदे, आदिनाथ ठुबे, गोविंद कदम, गोरक्ष कांडेकर, दत्तात्रय पांडोळे, अच्युत सुतार, रेणुका माता, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, बाळासाहेब कावरे, अरुण उरमुडे, गणेश गायकवाड आदी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.