Shankar Mandekar । राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. एकूण 288 मतदारसंघांपैकी 224 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. तर महाविकास आघाडीला अवघ्या 58 जागांवर जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा पराभव मविआसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चर्चेत असणारा भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार निवडून आला आहे.
महायुतीचे म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शंकर मांडेकर यांचा भोर विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळाला आहे. शंकर मांडेकर 20108 मताने विजयी झाले आहेत . त्यांनी त्यांचे विरोधी असणारे महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे यांचा दारुण पराभव केला आहे.
फेरी – २४ : मतदान Shankar Mandekar ।
१) शंकर हिरामण मांडेकर -६९६(१२६२५२)
२) संग्राम अनंतराव थोपटे -१२२०(१०६३४७)
३) अनिल संभाजी जगताप -१७(१३९२)
४) लक्ष्मण रामा कुंभार -२(४९५)
५) कुलदिप सुदाम कोंडे -३००(२८९४८)
६) दगडे किरण दत्ताञय -१०७(२५५५९)
७) नोटा -१५(२७११)
एकूण :२३५७(२९१७०४)
शंकर मांडेकर मतांनी आघाडीवर – १९९०५
महायुतीचे शंकर मांडेकर – १२६२५२
महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे – १०६३४७