ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी शेन वॉटसनची नियुक्ती

सिडनी – ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसन याची ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या (ACA) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी रात्री झालेल्या वार्षिक सभेमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर ट्विट करत याची माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये त्याने म्हटलय की “अध्यक्षपदी निवड होण हे माझ्यासाठी सन्माननीय आहे. कारण या पदामुळे भविष्यातील माझी भूमिका ही अधिक महत्त्वपूर्ण असणार आहे. याआधी ज्यांनी या पदावर काम केल आहे, त्यांच्या कार्याला मला आणखी पुढे घेऊऩ जायच आहे. ही संधी मला दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. क्रिकेटची सेवा करण्यासाठी माझी ही भूमिका मला नक्कीच मदत करेल. या माझ्या नव्या भूमिकेमुळे ज्या क्रिकेटने मला इतक काही दिल त्याच खेळाला मला काहीतरी देता येईल”.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here