लंडन – ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व महान लेग स्पिन गोलंदाज शेन वॉर्न याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्याची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली होती, त्यात तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
वॉर्नने स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून, तो द हंड्रेड स्पर्धेतील लंडन स्पिरीट या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला होता.
ही लीग सुरू झाल्यापासून वॉर्न आणि ट्रेंड रॉकेट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हेदेखील करोनाबाधित असल्याचे सांगितले गेले आहे.