मुंबई – कपूर घराण्यातील शनाया कपूरने भलेही बॉलीवूडमध्ये डेब्यू केले नसले तरीही ती सतत कोणत्या-न-कोणत्या कारणामुळे चर्चेत आणि प्रसिद्धिच्या झोतात असते. सतत डान्स क्लासच्या बाहेर स्पॉट करण्यात येणारी जान्हवी कपूरची चुलत बहिण शनायाने आपला डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शनाया ही शकीराच्या “हिप्स डोंट लाय’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेता अर्जुन कपूरची चुलत बहिण आणि संजय कपूरची मुलगी शनाया आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज असल्याचे मानले जात आहे. शनायाने नुकतेच आपले इंस्टाग्राम अकाउंट चाहत्यांसाठी खुले केले आहे. शनाया ही इंस्टाग्रामवर खूपच ऍक्टिव्ह असते.
View this post on Instagram
शनायाने आपला हा लेटेस्ट डान्स व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “भलेही मी सरळ उभी राहून 60 सेकंद श्वास घेवू शकत नाही, परंतु संजना मुतरेजासोबत मी प्रत्येकवेळी ड्रम सोलोसाठी चांगला परफॉर्म दिला आहे. या डान्स व्हिडिओवर शनायाची आई महीप कपूरनेही कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
तसेच सोहेल खानची पत्नी सीमा खाननेही शनायासाठी हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जान्हवी कपूरच्या “गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी शनायाने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलेले आहे.
View this post on Instagram