ज्येष्ठांच्या अधिकारांसाठी पुढे आली शमिता शेट्टी

1 ऑक्‍टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने अभिनेत्री शमिता शेट्टीने ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारांबाबत आपले आग्रही प्रतिपादन केले आहे. “हेल्प एज इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तिने आपले ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणारी पेन्शन वाढण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे, हे लोकांनी विसरायला नको, असेही तिने म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा आदर केला जायला हवा. परंतु अनेकदा आपण बघितले आहे की मुले, सुना आणि जावई आपल्या आई-वडिलांचा सासू सासऱ्यांचा का अनादर करतात. अनेकदा त्यांच्याच घरातून बाहेरही काढतात. त्यांच्याकडून खूप जास्त कामही करून घेतात. त्यांना वृद्धाश्रमातही टाकतात, असे निदर्शनास येते.

हे खूपच दुःखद आहे. या संदर्भात खूप काम करणे आवश्‍यक आहे, वृद्धांना संरक्षण देण्याचा कायदा आहे हे त्यांना समजायला हवे आणि त्यांनी मर्यादा रेषा ओलांडू नये, असे शमिता म्हणाली.

“कुंडली भाग्य’ च्या स्पेशल एपिसोडमध्ये शमिता शेट्टीने प्रथमच खास लावणी क्रमांक सादर केली होती. “मुहोब्बतें’नंतर तिने विशेष दखल घ्यावी, असे सिनेमे केलेच नव्हते. आताही तिच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. पण त्याऐवजी सामाजिक कामातून तिला अधिक आनंद मिळतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.