कोयनानगरः हिवाळी अधिवेशनानंतर पालक मंत्र्यांच्या नावांची यादी कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. अखेर काल शनिवारी रात्री राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. अखेर पुन्हा एकदा मंंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री शंभुराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे पर्यटन, खनिज, माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री शंभूराज देसाई शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहॆ. पर्यटनमंत्री या खात्याबरोबरच जिल्हा व पाटण तालुका विकासात अग्रेसर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.