बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची शनिवारी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या ड्रग्ज अँगलबाबत एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. याचवेळी तिचे वडील, ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूर यांना स्वर्गीय अभिनेता सुशांतच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे.
शक्ती कपूर हे आगामी न्याय ः द जस्टिस या चित्रपटात नार्कोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. तसेच जुबेर हा सुशांतसिंह राजपूत यांनी प्रेरित असलेल्या महेंद्र सिंह किंवा माही नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर अभिनेत्री श्रेया शुक्ला सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांच्या प्रेरणेने उर्वशी नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
अभिनेत्री सारा अली खान, अंकिता लोखंडे आणि कृती सॅनन यांच्या प्रेरणेने पात्रांसाठी कलाकारांचे कास्टिंग जवळजवळ पूर्ण झाले आहे. तसेच त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन आणि माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांची पात्रेही साकारण्यात येणार आहे.
दरम्यान, दिलीप गुलाटीद्वारा दिग्दर्शत न्याय ः द जस्टिस या चित्रपटात एका डान्स नंबरसह चार गाणे चित्रित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.